‘शक्ती मिल’ बलात्कार प्रकरण : नराधमांना हायकोर्टाचा दणका

0 1

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील शक्ती मिलच्या आवारात २०१३ साली झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींची फाशीची शिक्षा मुंबई हायकोर्टाने कायम ठेवली आहे. गुन्हेगारांना सुनावलेली शिक्षा ही कायद्याचा चौकटीत बसणारी असल्याचं हायकोर्टाने म्हटले आहे. बलात्कार प्रकरणातील आरोपींनी ३७६ कलमातील सुधारणेला आव्हान दिलं होतं. पण, हे आव्हान हायकोर्टाने फेटाळून लावलं.

मुंबईतील शक्ति मिल येथे २२ ऑगस्ट २०१३ रोजी महिला छायाचित्रकारावर सात जणांकडून सामुहिक बलात्कार करण्यात आला होता. अटक केलेल्यांमध्ये एक जण अल्पवयीन आरोपी होता. सुनावणीदरम्यान न्यायालयानं आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली होती. छायाचित्रकारावर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर टेलिफोन ऑपरेटरवर देखील बलात्कार झाल्याची घटना समोर आली होती. या घटनेनं मुंबई हादरून गेली होती. शिवाय, महिला सुरक्षेचा प्रश्न देखील मोठ्या प्रमाणात चर्चिला गेला होता. त्यानंतर राज्य सरकारने त्वरित हालचाल करून आरोपींना अटक करून खटला दाखल केला होता. कोर्टाने त्यांना फाशीची सजा फर्मावली.

या शिक्षेला आरोपींनी हायकोर्टात आव्हान दिलं, पण तुम्हाला ठोठावलेली सजा कायद्याच्या चौकटीत बसणारी असल्याचं सांगत हायकोर्टाने त्यांची फाशीची सजा कायम ठेवली आहे. या निर्णयानं राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आरोपींना सुनावलेली फाशीची शिक्षा निश्चित करण्यासाठीच्या सुनावणीचा मार्ग आता मोकळा झाला आहे

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More