Breaking News

 

 

माजी सरन्यायाधीशांना लाखाचा ऑनलाईन गंडा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी सरन्यायाधीश आर.एम.लोढा ऑनलाईन स्कॅमचे बळी पडले असल्याचे समोर आले आहे. लोढा यांना एक लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. त्यांनी दिल्लीतील मालविया नगर पोलीस ठाण्यात यासंबंधी तक्रार करण्यात आली आहे.

तक्रारीत दाखल केल्यानुसार, लोढा ई-मेलच्या माध्यमातून सतत आपले मित्र आणि सहकारी न्यायाधीस बी. पी. सिंह यांच्या संपर्कात असतात. १९ एप्रिल रोजी सिंह यांच्याकडून लोढांना एक मेल आला. मेलमध्ये आपल्या चुलत भावाच्या उपचारासाठी एक लाखांची तात्काळ गरज असल्याचे सांगण्यात आले होते. यानंतर त्यांनी तात्काळ ऑनलाईन व्यवहार करत १ लाख रुपये त्यांच्या खात्यात जमा केले.

न्यायाधीश बी. पी. सिंह यांची ई-मेल सेवा पुर्ववत झाल्यानंतर त्यांनी आपल्या संपर्क यादीत असणाऱ्या सर्वांना मेल पाठवत ई-मेल आयडी हॅक झाला होता अशी माहिती दिली. जेव्हा लोढा यांनी बी.पी.सिंह यांनी पाठवलेला मेल वाचला तेव्हा त्यांना आपली १ लाखांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर लगेच त्यांनी पोलिसांशी संपर्क साधत तक्रार दाखल केली. याबाबत पोलीस सद्या तपास करत असून हॅकरचा शोध घेण्याचा प्रयत्न चालू आहे.

372 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash