Breaking News

 

 

काश्मीरला मिळणार ‘खमके’ राज्यपाल…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारकडून लवकरच जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी किरण बेदी यांची नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे. किरण बेदी यांनी रविवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, सरकारकडून सत्यपाल मलिक यांच्याजागी जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी किरण बेदी यांची नियुक्ती होऊ शकते. पूर्वाश्रमीच्या कणखर आणि खमक्या पोलीस अधिकारी असलेल्या बेदी सध्या पदुच्चेरीच्या नायब राज्यपालपदाची जबाबदारी सांभाळत आहेत.

भाजप आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) यांचे सरकार बरखास्त झाल्यानंतर काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली होती. यानंतर काश्मीरमधील राजकीय आणि सामाजिक वातावरणात सातत्याने तणाव आहे. या पार्श्वभूमीवर मोदी सरकारकडून किरण बेदी यांची राज्यपालपदी नियुक्ती होण्याची शक्यता आहे. 

भाजपने पीडीपीचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर मेहबूबा मुफ्ती यांचे सरकार कोसळले होते. यानंतर काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या पाठिंब्यावर पीडीपीने पुन्हा एकदा सत्तास्थापनेसाठी प्रयत्न केले होते. त्याचवेळी अवघे दोन आमदार असलेल्या सज्जाद लोन यांच्या पीपल्स कॉन्फरन्सनेही भाजप आणि इतर १८ आमदारांचा पाठिंबा असल्याचे सांगत सरकार स्थापनेचा दावा केला होता. मात्र, या सगळ्यामुळे घोडबाजाराला ऊत येतील, असे सांगत राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी जम्मू-काश्मीरची विधानसभा बरखास्त केली होती.

762 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे