मुंबई (प्रतिनिधी) : जागतिक शेअर बाजारात सकारात्मक वातावरण दिसून आल्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून आला. अमेरिकन शेअर बाजार तेजीत बंद झाला, तर आशियाई शेअर बाजारातही तेजी दिसून आली. भारतीय शेअर बाजारात सुरुवातीच्या व्यवहारात तेजी दिसत आहे. मागील काही दिवसांपासून विक्रीचा जोर दिसत असलेल्या आयटी सेक्टरमध्ये आज खरेदीचा जोर दिसत आहे. 

आज शेअर बाजारातील व्यवहार सुरू झाले, तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ११३ अंकांनी वधारता ६२,२४३ वर तर निफ्टी ३५ अंकांनी वधारत १८५३२ अंकांवर खुला झाला. सकाळी ९.४० वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स ६०अंकांच्या तेजीसह ६२.१९०.८८ अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी २० अंकांच्या तेजीसह १८,५१८.१० अंकांवर व्यवहार करत आहे.