Breaking News

 

 

बेळगांव येथे अपघात : पाचजणांचा मृत्यू

बेळगाव (प्रतिनिधी) : बंगळुरू-पुणे महामार्गावर बेळगावमधील श्रीनगर गार्डन जवळ जीप आणि ट्रकचा आज (रविवार) भीषण अपघात झाला. यामध्ये पाचजण जागीच ठार झाले. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. मृत झालेले पाचहीजण औरंगाबादमधील आहेत. भरघाव जाणाऱ्या जीपचे टायर फुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

अपघातग्रस्त औरंगाबादहून जीपने सहाजण बंगळुरूला निघाले होते. बेळगावजवळ गेल्यानंतर जीपचे समोरील टायर फुटले. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून ती दुभाजकावरून पलीकडील रस्त्यावर गेली. त्याचवेळी कोल्हापूरकडे जाणाऱ्या ट्रकची जोरदार धडक बसली. धडक जबरदस्त असल्याने जीपमधील पाच जण जागीच ठार झाले तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.

663 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे