Breaking News

 

 

विधानसभा निवडणूकीत युतीचा ‘फिप्टी-फिफ्टी’चा फॉर्म्युला : चंद्रकांतदादा पाटील

औरंगाबाद (प्रतिनिधी) :  लोकसभा निवडणुकांपाठोपाठ शिवसेना-भाजप राज्यातील विधानसभा निवडणूकही एकत्र लढणार आहेत. त्यासाठी युतीचा फिफ्टी-फिफ्टीचा फॉर्म्युला ठरला आहे. राज्यात विधानसभेसाठी भाजप १३५ आणि शिवसेना १३५ जागांवर लढेल. मित्र पक्षांसाठी १८ जागा सोडण्यात येणार असल्याचे, महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज (रविवार) दिली. ते औरंगाबाद येथे दुष्काळी भागातील दौऱ्यावेळी बोलत होते.  

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, भाजप-शिवसेना विधानसभेत एकत्रच लढेल. त्यात कोणताही बदल होणार नाही. २८८ जागांवर युती लढेल. त्यातील १८ जागा या युतीतील मित्र पक्षांना सोडण्यात येतील. तर, पूर्वी ठरल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी १३५ जागांवर आपले उमेदवार उभे करेल. तेवढ्याच जागांवर शिवसेनेचे उमेदवार असतील. त्यामुळे युतीच्या या जागावाटपात काही बदल होणार नाहीत. विधानसभेलाही शिवसेना-भाजप, मित्रपक्ष एकत्रितपणे सामोरे जातील, असही चंद्रकांत पाटील म्हणाले.

1,818 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *