Breaking News

 

 

#MeToo : अनु मलिकांना ‘यशराज’चे दरवाजे बंद

मुंबई (प्रतिनिधी) : बॉलिवूड गायक आणि संगीतकार अनू मलिक यांच्यावर मीटू अंतर्गत आरोप लावण्यात आले होते. त्यानंतर त्यांना रिअॅलिटी शो इंडियन आयडॉलमधून बाहेर पडावे लागले होते. परंतु आता यशराज फिल्म्स स्टूडिओ (व्हायआरएफ) चे दरवाजे अनु मलिक यांच्यासाठी बंद करण्यात आले आहेत. व्हायआरएफ स्टूडिओकडून अनू मलिक यांच्यावर बॅन लावण्यात आला आहे.

यशराज फिल्म्स स्टूडिओच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘अनु मलिक यांना यशराज स्टूडिओत प्रवेश करण्यास बंदी आहे. यशराज स्टूडिओ लैंगिक शोषण केलेल्या आरोपींच्या विरोधात आहे. गेल्या वर्षीही यशराज फिल्म्सने लैंगिक छळाचे आरोप लावण्यात आलेल्या त्यांच्या वरिष्ठ कार्यकारी अधिकारी असलेल्या आशिष पटेललाही काढून टाकले असल्याचे’ त्यांनी म्हटले आहे. अनु मलिकसह आलोक नाथ आणि साजिद खानलाही यशराज स्टूडिओमध्ये प्रवेश बंदी करण्यात आली आहे. 

600 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा