Breaking News

 

 

कोल्हापुरातील महास्वच्छता अभियान उत्स्फुर्त…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सेवाभावी संस्था, दिव्यांग बांधव, कृती समिती,  तरुण मंडळे, तालीम संस्था, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटना व महापालिकेच्यावतीने आज (रविवार) सकाळी महास्वच्छता अभियान उत्स्र्तफुर्तपणे राबविण्यात आले. यावेळी ८ जेसीबी व १५ डंपरच्या सहाय्याने कचऱ्याचा उठाव करण्यात आला. या मोहिमेत अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, उपआयुक्त मंगेश शिंदे, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, आरोग्यधिकारी दिलीप पाटील, जल अभियंता सुरेश कुलकर्णी आदींनी नियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहिले.

आज सकाळी पंचायत समिती कार्यालयाजवळ महापौर सौ.सरिता मोरे व आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते या मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. यावेळी हॉकी स्टेडीयम ते सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, एन. टी. सरनाईक कॉलनी, मैलखड्डा, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, लक्ष्मीपूरी या परिसरातील स्वच्छता, सिध्दीविनायक गणपती मंदीर पुल, लक्ष्मीपूरी ते आयर्विन ब्रिज तसेच शहरातील मुख्य भागांची स्वच्छता करण्यात आली. तसेच जयंती नाला, रंकाळा तलाव, श्याम सोसायटी येथील नाल्यातील गाळ काढण्यात आला.

यावेळी पालिका अधिकारी, कर्मचारी, सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी, क्रिडाईचे पदाधिकारी, स्वरा फौडेशनचे कार्यकर्ते, आरोग्य विभागाचे ३०० कर्मचारी, दिव्यांग बांधव, स्वयंसंस्थेचे कार्यकर्ते आदींनी उत्सफुर्त सहभाग नोंदविला.

225 total views, 9 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे