Breaking News

 

 

प्रलंबीत शेती वीज कनेक्शन त्वरीत द्यावीत : आ. प्रकाश आबिटकर

गारगोटी (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीला मिळणाऱ्या वीजेचे कनेक्शनचा प्रश्न गेले ३ ते ४ वर्षापासून प्रलंबित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत प्रचंड असंतोष पसरला आहे. त्यामुळे ही प्रलंबीत शेतीला मिळणाऱ्या विजेच्या तात्काळ जोडणी कराव्यात, अशी मागणी आ. प्रकाश आबिटकर यांनी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी पाईप-लाईन व मोटर पंप खरेदी केली आहे. वीजेचे कनेक्शन मिळण्यासाठी पैसे भरूनही अद्याप जिल्ह्यातील ६ हजाराहून अधिक शेतकऱ्यांना वीज जोडण्या मिळालेल्या नाहीत. याबाबत विधानसभेमध्ये प्रश्न मांडून याबाबतची  मागणी केली होती. परंतू याबाबत शासनाने कोणतीही कार्यवाही केली नाही. यामुळे दिवसेंदिवस प्रलंबित असणाऱ्या वीज जोडणीमुळे महावितरण कंपीनीच्या कारभाराबाबत शेतकऱ्यांच्यामध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे.

सध्या महावितरण कंपनी करून अर्ज स्विकारले जात असून  त्यांना कोणत्याही प्रकारची मंजूरी अथवा कोटेशन देवून पैसे भरून घेतले जात नाहीत. याउलट त्यांना सोलर पंपाकरीता ऑनलाईन अर्ज करण्यास सांगितले जात आहे. सोलर योजनेमध्ये ३ एचपी, ५ एचपी शेतीपंपाची सुविधा असून ५ एचपी वरील मागणी असणाऱ्या शेतकऱ्यांना सोलर अथवा विद्युत पंप कनेक्शन यापैकी कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. यामुळे अशा शेतकऱ्यांना वीज जोडणीपासून वंचित राहावे लागत आहे. यासाठी तरी शेतीपंपाची विज जोडणी तात्काळ करण्याची मागणी आ. प्रकाश आबिटकर यांनी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे.

1,155 total views, 3 views today

One thought on “प्रलंबीत शेती वीज कनेक्शन त्वरीत द्यावीत : आ. प्रकाश आबिटकर”

  1. २०१५ चे कनेक्शन आहे माझे आजुन शेतात पोल पडले नाहीत.. आजुन पर्यंत बोलतात आज देतो उद्या देतो.. जानेवारीला बोलले फेब्रुवारी मधे पाहिल्या आठवड्यात करतो… प्रत्येक महिन्यात यांच्या महावितरण कंपनीच्या दाराला खेटे घालावे लागतात… गारगोटी मधे गेले की बोलतात पिंपळगाव महावितरण मधे जावा… आणि पिंपळगाव मधे बोलतात गारगोटी मधे जावा.. आज जून चा पहिला आठवडा चालू झाला आजुन काम चालू झाले नाही… शेतकर्‍यांनी किती वेळा यांच्या दाराला जायचे म्हणजे ही लोक शेतीचे कनेक्शन करून देणार… याला जबाबदार कोण शेतकरी की सरकार…

    माझ्या अर्जा साठी खुप वेळा आमदार साहेबांनी प्रयत्न केले.. तरी पण त्यांना पण ही महावितरण ची लोक बोलतात साहेब या चार दिवसात करतो त्यांचे काम.. आणि चार दिवसाचे चार महिने झाले तरी पण कोणी आले नाही कनेक्शन जोडायला..
    आमदार साहेब तुम्ही आमच्यासाठी खुप प्रयत्न केलेत त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे.. . सदैव असेच शेतकर्‍यांच्या पाठीशी रहा..

    अर्जदार विलास बाळकु भारमल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे