Breaking News

 

 

कलबुर्गी हत्येप्रकरणी एकाला अटक

मुंबई (प्रतिनिधी) : कन्नड विचारवंत आणि लेखक एम.एम.कलबुर्गी यांच्या हत्येप्रकरणी बेळगावातून एकाला अटक करण्यात आली आहे. कलबुर्गी यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने या प्रकरणी प्रविण प्रकाश चतुर (बेळगाव) याला अटक केली आहे.

एसआयटीने दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या प्रविण चतुर याला ७ जूनपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. कलबुर्गी यांनी मूर्ती पूजेसंबंधी आक्षेपार्ह विधान केल्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली असे यापूर्वी अटक करण्यात आलेल्या आरोपीने पोलिसांना सांगितले होते. जून २०१४ मध्ये अंधश्रद्धा विरोधी विधेयकावर चर्चा सुरु असताना कलबुर्गी यांनी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते यू.आर.अनंतमूर्ती यांचा संदर्भ देऊन मूर्ती पूजेसंबंधी आक्षेपार्ह विधान केले होते. त्या वक्तव्यामुळे कलबुर्गी यांना हिंदू विरोधी ठरवून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला असे आरोपीने सीआयडीला तपासादरम्यान सांगितले होते.

गौरी लंकेश हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीने दिलेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली होती. गणेश मिसकिन आणि अमित बद्दी दोघे उत्तर कर्नाटकाचे रहिवासी असून कट्टरपंथीय हिंदू संघटनेची संबंधित असल्याचे सांगण्यात आले होते.

333 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

देश-विदेश