Breaking News

 

 

ब्राझीलच्या ‘या’ फुटबॉलपटूवर बलात्काराचा आरोप

पॅरिस (वृत्तसंस्था) : ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमार ज्युनिअरवर पॅरिसमध्ये एका महिलेनं बलात्काराचा आरोप केला आहे. बलात्काराचा आरोपात तथ्य नसल्याचे नेमारचे वडिल आणि मॅनेजरने सांगितले आहे. ब्लॅकमेल करुन पैसे उखळण्यासाठी हा आरोप केल्याचे नेमारच्या वडिलांचे म्हणणं आहे. साओ पाउलो पोलिसांत नेमार विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दाखल केलेल्या तक्रारीनुसार, पॅरिसमधील एका हॉटेलमध्ये फुटबॉलपटू नेमार याने दारूच्या नशेत मारहाण करून बलात्कार केल्याचा आरोप एका महिलने केला आहे. ब्राझीलमधील स्थानिक संकेतस्थळ यूओएलकडे महिलेने दाखल केलेल्या तक्रारीची प्रत आहे. त्यानुसार, १५ मे रोजी पॅरिसमधील हॉटेलमध्ये हा सर्व प्रकार घडला आहे.

पिडीत महिला ब्राझीलची आहे. सोशल मिडीयावरून नेमार आणि त्या महिलेची ओळख झाली होती. सोशल मिडीयावर दोघांमध्ये संवाद होत होता. त्यावेळी नेमारने तिला पॅरिसमध्ये भेटण्याचे सांगितले. त्यानुसार, पिडीत महिला पॅरिसमधील एका हॉटेलमध्ये थांबली होती. त्यावेळी हा सर्व प्रकार घडला असा आरोप आहे. बलात्कार आणि मारहाणीच्या आरोपाचे नेमारच्या वडिलांनी खंडन केले आहे. आमच्याकडे सर्व पुरावे आहेत आणि ते वकिलांकडे दिलेले आहेत, असे त्यांनी सांगितले आहे.

333 total views, 9 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे