Breaking News

 

 

संजीव पुनाळेकर, विक्रम भावे यांच्या सीबीआय कोठडीत वाढ…

पुणे (प्रतिनिधी) :  डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेले संजीव पुनाळेकर आणि त्यांचे सहकारी विक्रम भावे यांच्या सीबीआय कोठडीत येत्या ४ जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे. पुण्यातील शिवाजी नगर न्यायालयाने या दोघांनाही आज (रविवार) सीबीआय कोठडी सुनावली आहे.

संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना या आधी शिवाजीनगर न्यायालयाने १ जून पर्यंत सीबीआय कोठडी सुनावली होती. आज या दोघांच्याही कोठडीची मुदत संपली होती. त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्यांना ४ जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. 

252 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग