Breaking News

 

 

केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा…

मुंबई (प्रतिनिधी) : यंदा केंद्र सरकारकडून पंतप्रधान पिकविमा योजनेत खरीप हंगामासाठी बदल करण्यात येणार आहेत. सरकारने पिकविमा योजनेच्या व्याप्तीत बदल करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यानुसार यावेळी सर्व पिकांसाठी विम्याचा जोखीम स्तर ७० टक्के असणार आहे.

शेतकऱ्यांना नेहमीच बदलत्या हवामानाचा फटका बसतो. त्यावेळी त्यांना पिकविम्याचा मोठा आधार मिळतो. परंतु, अनेकदा काही तांत्रिक अडचणी असल्याने पिकविमा मिळत नाही. त्यामुळे आता या दुष्टचक्रातून शेतकऱ्यांची सुटका होणार आहे. ऑनलाईन अर्जासह विमा हप्ता भरण्यासाठी २४ जुलैपर्यंत मुदत असणार आहे. यामध्ये भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, भुईमूग, सोयाबीन, कारले, मूग, उडीद, तूर, कापूस, मका आणि कांदा या तेरा प्रमुख पिकांसाठी ही योजना लागू करण्यात आली आहे. कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना बंधनकारक तर बिगरकर्जधारक शेतकऱ्यांसाठी ऐच्छीक असणार आहे. खातेदाराला किंवा त्याच्या मुलाला तसेच भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनाही याचा लाभ मिळणार आहे.

हवामानाच्या प्रतिकूलतेमुळे पिकांची पेरणी न झाल्यास वीम्याचा लाभ मिळू शकणार आहे. त्यासाठी पेरणी न झालेले क्षेत्र सर्वसाधारण क्षेत्राच्या ७५ टक्क्यांपेक्षा जास्त असणे बंधनकारक असणार आहे. त्यामुळे शेती क्षेत्रातील जोखीम थोडी कमी होणार आहे.

765 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे