Breaking News

 

 

‘म्हाडा’ची मुंबईतील ‘२१७’ घरांसाठीची आज सोडत…

मुंबई (प्रतिनिधी) :  मुंबई शहरात सामान्य लोकांना रास्त दरात हक्काचे घर मिळवून देण्यासाठी ‘म्हाडा’कडून आज (रविवार) मुंबईतील २१७ घरांसाठीची सोडत काढण्यात येणार आहे. या सोडतीचे थेट प्रक्षेपण म्हाडाच्या वेबसाईटवरून http://mhada.ucast.in केले जाणार आहे. मुंबई म्हाडाच्या वांद्रे इथल्या कार्यालयाच्या प्रांगणात आज या अर्जाची संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे.

यंदाच्या सोडतीमध्ये अल्प उत्पन्न गटाकरीता सहकार नगर, चेंबूर येथील १७० सदनिका व मध्यम उत्पन्न गटाकरिता ४७ सदनिकांचा समावेश आहे. म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावरून वेबकास्टिंगद्वारे या सोडतीचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. सोडतीसाठी मोठा सभामंडप उभारण्यात आला आहे. मंडपात तीन मोठ्या स्क्रीन लावण्यात आल्या आहेत.

यावेळी गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता, पालकमंत्री विनोद तावडे, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर, म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत, सभापती मधू चव्हाण उपस्थित राहणार आहेत.

66 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे