Breaking News

 

 

राष्ट्रवादी आमदारांच्या गाडीला अपघात : चार जखमी

जळगाव (प्रतिनिधी) : एरंडोल-पारोळा विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश पाटील यांच्या गाडीचा आज (रविवार) अपघात झाला. या अपघातात आमदार सतीश पाटील यांच्यासह चार जण थोडक्यात बचावले आहेत.

मिळालेली माहितीनुसार, आमदार सतीश पाटील हे मुंबईला कामानिमित्त गेले होते. ते आपल्या खासगी गाडीने जळगावहून पारोळा जात असताना रवांजे फाट्याजवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला. दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात गाडीला अपघात झाला. गाडी खड्ड्यात जाऊन ट्रान्सफार्मरच्या तारांना धडकली. आमदार पाटील यांच्यासोबत गाडीत एस.एस.पाटील, भैय्या माने, शिवाजी पवार व चालक गुलाब पाटील होते. चौघांना किरकोळ दुकापत झाली आहे.

1,404 total views, 15 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा