Breaking News

 

 

झारखंडमध्ये चकमक : एक जवान शहीद

रांची (वृत्तसंस्था) : झारखंडमध्ये आज (रविवार) सकाळी सीमा सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत चार ते पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. यात एक जवान शहीद झाला आहे. तर अन्य चार जवान जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

झारखंडच्या डुमका येथे रानेश्वर ठाण्याच्या हद्दीत कठलियाजवळ ही चकमक झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. शिकारीपाडा आणि रानेश्वर ठाण्याच्या हद्दीतील जंगलात काही नक्षलवादी असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तेथे शोधमोहीम हाती घेण्यात आली होती. शोधमोहीम सुरू असतानाच लपलेल्या नक्षलवाद्यांनी गोळीबार केला.  त्यांना जवानांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले.

जवानांच्या प्रत्युत्तरात चार नक्षलवादी ठार झाले. पण दुर्दैवाने एक जवान शहीद तर अन्य चार जवान गंभीर जखमी झाले आहेत. जवानांवर डुमका येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परिसरात  शोधमोहीम अद्याप सुरू असल्याची माहिती पोलीस अधिक्षक वाय. एस. रमेश यांनी दिली.

294 total views, 12 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा