अहमदाबाद (वृत्तसंस्था) : गुजरातचे नवे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. भूपेंद्र पटेल दुसऱ्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत.

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवला. भाजपला १५६ जागांवर दणदणीत विजय मिळवला आणि पुन्हा एकदा सत्ता काबीज केली. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शाह भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह देशभरातील महत्वाचे नेते उपस्थित होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही या सोहळ्याला उपस्थित होते.

भाजपने गुजरात विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवला. त्यानंतर भाजपच्या बैठकीत मुख्यमंत्रिपदासाठी भूपेंद्र पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. गुजरातच्या मुख्यमंत्रिपदासाठी भाजपकडे आमदार कनू देसाई यांनी भूपेंद्र पटेल यांच्या नावाची शिफारस केली होती. त्यानंतर भाजपच्या बैठकीत गुजरातच्या मुख्यमंत्रिपदासाठी एकमताने भूपेंद्र पटेल यांची निवड करण्यात आली.