Breaking News

 

 

ऋतुराज पाटील यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव

कोल्हापूर (प्रतिनिधी) : डी. वाय. पाटील संस्थेचे विश्‍वस्त आणि युवा नेते ऋतुराज पाटील यांचा वाढदिवस उत्साहात पार पडला. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी ऋतुराज पाटील यांना शुभेच्छा दिल्या.

मागील १२ वर्षाहून अधिक काळ अनेक सेवाभावी उपक्रमातून  ऋतुराज पाटील यांनी सामाजिक आणि राजकीय जीवनात प्रवेश केला. शहराबरोबर त्यांनी जिल्ह्यात युवाकांसाठी विविध उपक्रम राबवले. युवकांची ताकद समाजाच्या विकासात आणली पाहिजे हा हेतू डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आर. पी. ग्रुप नावचं संघटन तयार केलं. त्यानंतर आर. पी. प्रेमी आणि ऋतुराज पाटील विचार मंचच्या माध्यमातून जिल्ह्यात युवकांचे प्रबळ असं संघटन उभारलं.

शुक्रवारी  सकाळी बावडा येथील निवासस्थानी  सौ. शांतादेवी डी. पाटील, डॉ. संजय पाटील,  आ. सतेज पाटील, सौ.वैजयंती पाटील ,  सौ. राजश्री काकडे, सौ. प्रतिमा पाटील,  सौ. पूजा ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, करण काकडे, देवराज पाटील, निशांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत केक कापून शुभेच्छा दिल्या .
दुपारी चार नंतर ऋतुराज पाटील यांनी अजिंक्यतारा या संपर्क कार्यालयात शुभेच्छा स्विकारल्या. कार्यालयाच्या प्रवेशव्दारासमोर हातकणंगलेच्या अमोल मोंगळे या तरुणाने भावी आमदार असं नमूद केलेली ऋतुराज पाटील यांची आकर्षक अशी रांगोळी रेखाटली होती.  डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेच्या कर्मचार्‍यांनी पाटील यांच्या वाढदिवसाकरिता पुस्तक स्वरुपातील बनविलेला केक सर्व कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत कापून ऋतुराज पाटील यांना शुभेच्छा दिल्या गेल्या.

खा. संजय मंडलिक,   महापौर सरिता मोरे, विरेंद्र मंडलिक, उपमहापौर भूपाल शेटे, बिद्री कारखान्याचे संचालक विजयसिंह मोरे,  करवीरचे सभापती राजेंद्र सूर्यवंशी,  माजी आमदार सुरेश साळोखे , महापालिकेचे  नगरसेवक, जिल्हा परिषद, पं. स. सदस्यांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.  शहरासह जिल्ह्यातील आर. पी. ग्रुपचे पदाधिकारी त्याच बरोबर  विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी यांनीही युवा नेते ऋतुराज पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. डॉ. डी. वाय पाटील,  युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील. गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, माजी  मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खा. धैर्यशील माने,  अमित राज ठाकरे,  अभिनेता अजय देवगण, कपिल शर्मा, आ. हसन मुश्रीफ, आ. चंद्रदीप नरके,  रोहित पवार, माजी खा .राजू शेट्टी, विश्‍वजित कदम, माजी आमदार प्रकाश आवाडे, पार्थ पोवार  यांनी ऋतुराज पाटील यांना दूरध्वनीवरुन शुभेच्छा दिल्या. डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेचे कार्यकारी संचालक ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. ए. एन. जाधव, डॉ. सतिश पावसकर, प्राचार्य डॉ. महादेव नरके, डॉ. आर. जी. सावंत , प्राचार्य जयेंद्र खोत यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या.

1,032 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे