Breaking News

 

 

दाक्षिणात्य नेत्यांचा हिंदी द्वेष पुन्हा उफाळला !

चेन्नई (वृत्तसंस्था) : दक्षिणेकडील राज्यांचा हिंदी भाषेस असलेला विरोध काही नवा नाही. आता पुन्हा एकदा हिंदी भाषेवरून वाद पेटण्याची शक्यता आहे. अभिनेता व मक्कल निधी मयम पक्षाचे प्रमुख कमल हसन आणि डीएमकेचे नेते, खा. टी. सीवा यांनी तामिळनाडूतील शाळांमध्ये त्रिभाषा प्रणाली लागू करण्याच्या केंद्र सरकारच्या प्रस्तावाला विरोध केला आहे.

केंद्र सरकार तमिळनाडूत हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न करून आगीशी खेळण्याचा प्रयत्न करत आहे. तमिळनाडूवर जर हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न केला तर येथील लोक ते कदापि सहन करणार नाहीत, आम्ही कोणत्याही परिणामांना सामोरे जायला तयार आहोत, असा इशारा टी. सीवा यांनी दिला. तर कमल हसन यांनीही मी अनेक हिंदी सिनेमांमध्ये काम केले आहे, मात्र माझा सल्ला आहे की,  हिंदी भाषा कोणावरही लादू नये, असे सांगत आपला विरोध जाहीर केला आहे.

306 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे