Breaking News

 

 

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा प्रश्नच नाही : जयंत पाटील

मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा स्वतंत्र पक्ष आहे. कोणत्याही परिस्थितीत आमचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार नाही. दिल्लीत पक्षाध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यात त्याबद्दल चर्चाही झालेली नाही. या बातम्या माध्यमांनी पसरवल्या आहेत. याबाबत खुद्द शरद पवारांनीही आश्चर्य व्यक्त केले होते, असे सांगत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विलीनीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम दिला.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज (शनिवार) राष्ट्रवादीच्या नेत्यांची आणि नूतन खासदारांची मुंबईत आज बैठक आयोजित केली होती. या बैठकीत झालेल्या प्रमुख निर्णयांबद्दल जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा निवडणुकीत मागच्या वेळेपेक्षा जास्त जागा लढवणार आहे. राष्ट्रवादीची ताकद नि:संशय वाढली आहे. जो जिंकणारा उमेदवार आहे त्याला ती जागा दिली पाहिजे, असा निष्कर्ष या बैठकीत निघाला. कुणाचे कोणते पारंपरिक मतदारसंघ आहेत हे न पाहता जो उमेदवार मतदारसंघ जिंकेल त्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीत नव्या आणि तरुण चेहऱ्यांना संधी दिली जाईल.

375 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे