कोल्हापूर (प्रतिनिधी) : नुकताच जगभरातील सुमारे १३० लघुचित्रपटांमधून अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या ३१ लघुचित्रपटातून ‘नजरिया’ या कोल्हापूरमध्ये तयार झलेल्या हिंदी लघुचित्रपटाला पुणे येथील मानांकित ११ व्या आरोग्य चित्रपट महोत्सवात वरिष्ठ अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या प्रमुख उपस्थितीत व लेखक/अभिनेता ऋषीकेश जोशी यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट लघुचित्रपट म्हणून द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. यामुळे कोल्हापूर कला क्षेत्रातून संबंधित टीमचे अभिनंदन होत आहे.

पुणे या ठिकाणी ज्ञात-अज्ञात ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अशा अनेक निर्माते, लेखक, दिग्दर्शक, कलाकार व तंत्रज्ञानांच्या सर्वोत्कृष्ट कलात्मक चित्रपटांचे संरक्षण, संवर्धन केले जाते. त्या नॅशनल फिल्म आर्किव्हज् ऑफ इंडियाच्या सुबक वास्तूतील सिल्व्हर स्क्रीनवर आपल्या कोल्हापुरातील लघुचित्रपटाचे टाळ्यांच्या गजरात प्रदर्शन व्हावे व टाळ्यांच्या गजरात पुरस्कार मिळावा याच्यासारखा अभिमान आणि आनंद दुसरा नाही.

या कलाकृतीला उच्च शिक्षण-तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांत पाटील व अंजली पाटील यांचे या लघुचित्रपटासाठी विशेष सहकार्य, आशीर्वाद लाभले. ‘नजरिया’ यावर्षी एप्रिल महिन्यापासून सुरु झालेला लॉसएंजेल्स (अमेरिका) फेस्टिव्हलमधील सर्वोत्तम प्रेरणादायी लघुचित्रपट पुरस्कार ते डिसेंबरमधील हा आरोग्य फेस्टिव्हल व पुणेमधील सर्वोत्कृष्ट लघुचित्रपट दुसरा क्रमांक पुरस्कार अशा देश-विदेशातील मिळून एकूण १५ पारितोषिकांच्या बहारदार यशाने २०२२ या वर्षाची नजरियाने यशस्वी सांगता केली. ‘नजरिया’ लघुपट हा ड्रीम रिबन मुंबई-निर्मीत जितेंद्र कर्डिले ग्रुप ऑफ कंपनीज् आणि या लघुपटाचे पुणे-प्रस्तूत किरण विमल पोटे लेखक-दिग्दर्शक असून, कोल्हापूरच्या कला विश्वात त्याच्या यशाने नवीन ऊर्जा निर्माण झाली आहे.