Breaking News

 

 

अनुदानित, विनाअनुदानित सिलिंडरच्या किमतीत वाढ…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी स्वयंपकाच्या गॅस सिलिंडरची किंमत वाढली आहे. विनाअनुदानित एलपीजी सिलिंडर २५ रूपयांनी महागले आहे. तर, अनुदानित सिलिंडरच्या किमतीत १ रूपया २३ पैशांची वाढ आज (शनिवार) पासून झाली आहे.

दिल्लीत १ जून म्हणजेच आजपासून अनुदानित सिलिंडरचा दर ४९७ रुपये ३७ पैसे इतका झाला आहे. तर मुंबईतल्या अनुदानित सिलिंडरची किंमत ४९५ रुपये ९ पैसे इतकी झाली आहे. एचपीसीएल, बीपीसीएल या कंपन्यांनी ही माहिती दिली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चं तेल महाग झाल्याने आणि डॉलरच्या तुलनेत रूपया कमकुवत झाल्याने सिलिंडरच्या किंमती वाढल्या आहेत.

मुंबईत विनाअनुदानित सिलिंडरची किंमत ७०९ रुपये ५० पैसे इतकी झाली आहे. १ एप्रिलला गॅस सिलिंडरच्या किंमती वाढवल्या होत्या. अनुदानित सिलिंडर मिळत असलेल्या कुटुंबाला वर्षाला १२ सिलिंडर मिळतात आणि सबसिडीचे पैसे बँक खात्यात जातात. आज झालेल्या दरवाढीमुळे सामान्यांचे बजेट कोलमडणार आहे.

594 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा