Breaking News

 

 

आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याला ‘ईडी’कडून समन्स

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हवाई वाहतूक उद्योगातील करारातील आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) समन्स बजावला आहे. ईडीने प्रफुल्ल पटेल यांना ६ जून रोजी सकाळी साडे अकरा वाजता कार्यालयात चौकशीसाठी बोलावले आहे.

आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी हवाई वाहतूक उद्योगातील ‘लॉबिस्ट’ दीपक तलवार हा सध्या तुरुंगात आहे. आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असणारे काही हवाई मार्ग तलवारने तीन आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांना मिळवून दिले होते. या मोबदल्यात तलवारला २००८- ०९ या कालावधीत २७२ कोटी रुपये मिळाले, असा दावा ईडीने न्यायालयात केला होता.

आर्थिक स्थिती नसताना ७०,००० कोटी रुपये किंमतीच्या १११ विमानांची खरेदी, एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्सचे विलीनीकरण, परकीय गुंतवणूकीतून प्रशिक्षण संस्था सुरु करणे. तसेच आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असणारे काही हवाई मार्ग खासगी कंपन्यांना देणे अशा चार प्रकरणांचा ईडीकडून तपास सुरु आहे. हे सर्व प्रकरण यूपीए- १ च्या काळातील असून त्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्याकडे विमान वाहतूक मंत्रीपदाचा कार्यभार होता.

600 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे