Breaking News

 

 

‘घटना वाचविण्यासाठी इंच-इंच लढू…’

दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभा निवडणुकीतील पराभवाच्या झटक्यातून काँग्रेस अद्याप सावरलेली नाहीये. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पदाचा राजीनामा दिलेला आहे. काँग्रेसजनांकडून राजीनामा मागे घ्यावा, यासाठी दबाव येत असला तरी ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. नूतन खासदारांची त्यांनी आज (शनिवार) बैठक घेतली. घटना वाचविण्यासाठी आपण लढाई द्यायची आहे. भाजपविरोधात आम्ही ५२ खासदारच पुरेसे आहोत, इंच-इंच लढू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

नूतन खासदारांना त्यांनी ‘संघर्षमंत्र’ दिला. आपली लढाई संविधान वाचवण्यासाठी आहे हे पक्षाशी जोडलेल्या प्रत्येकानं लक्षात ठेवावं. असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला. काँग्रेस संसदीय पक्षाची आज बैठक झाली. यात सोनिया गांधींची एकमतानं संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. यावेळी सर्व खासदारांना राहुल गांधींनी संबोधित केलं. 

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला आहे. काँग्रेसला यंदा केवळ ५२ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. दोन जागा कमी पडल्यामुळे काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदही गमावलं आहे. ‘या अपयशानं खचून न जाता आपला लढा सुरूच ठेवा,’ असं आवाहन राहुल गांधी यांनी खासदारांना केलं.

420 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा