Breaking News

 

 

ममता बॅनर्जींची ‘आरएसएस’ विरोधात नवी चाल !

कोलकाता (वृत्तसंस्था) : लोकसभा निवडणुकीत भाजपने दिलेल्या धक्क्यानंतर ममता बॅनर्जी यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आतापासूनच तयारीला सुरुवात केली आहे. यासाठी ममता बॅनर्जी यांनी नुकतीच एक गुप्त बैठक घेतल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी सामना करण्यासाठी पक्षात दोन नव्या पथकांची स्थापना केली.

मिळालेल्या माहितीनुसार, ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जय हिंद वाहिनी आणि बंग जननी वाहिनी या दोन नव्या पथकांची स्थापना करण्यात आल्याचे ममतांनी जाहीर केले. यापैकी जय हिंद वाहिनीच्या अध्यक्षपदी आणि संयोजक पदावर ममतांनी आपले बंधू कार्तिक बॅनर्जी व गणेश बॅनर्जी यांची नियुक्ती केली. तर बंग जननी वाहिनी या पथकाचे अध्यक्षपद तृणमूलच्या खासदार काकोली घोष दस्तीदार यांच्याकडे देण्यात आले आहे. 

ममतांनी म्हटले की, गुन्हेगारी आणि समाज कंटक प्रवृत्तीचे लोक भाजपमध्ये गेले आहेत. हे लोक राज्यात अस्थिरता पसरवत आहेत. त्यामुळे अशा लोकांची यादी तयार करण्यात यावी, असा आदेशही त्यांनी दिला आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत पक्षाचा झालेला पराभव हा स्थायी स्वरुपाचा आहे. त्यामुळे चिंता करण्याची गरज नसल्याचे  ममतांनी सांगितले.

882 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

 

क्रीडा