Breaking News

 

 

राज्यात ‘ड्राय डे’ची संख्या कमी होणार : चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर (प्रतिनिधी) : मद्यविक्रीतून मिळणारा महसूल वाढविण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने ‘ड्राय डे’ बाबतचे धोरण बदलण्याचे ठरवले आहे. त्यानुसार राज्यात ‘ड्राय डे’ची संख्या कमी करण्यासाठी एक समिती नियुक्त केली आहे. समितीच्या अहवालानंतर राज्यात सर्वत्र ड्राय डेचे धोरण समान असेल, अशी माहिती राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

सध्या जिल्हानिहाय ड्राय डे जाहीर केला जातो. जिल्ह्यातील सण-उत्सवानुसार ड्राय डे घोषित करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. “काही ठिकाणी ड्राय डेच्या नावाखाली गरज नसतानाही मद्याची दुकाने बंद केली जातात. राज्यातील ड्राय डे धोरणासंदर्भात सुस्पष्टता आणि सुसूत्रता आणावी यासाठी सरकारने समिती नियुक्त केली आहे”,  असे बावनकुळे यांनी सांगितले. ड्राय डेसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे जे अधिकार आहेत त्याऐवजी संपूर्ण राज्यात ड्राय डेचे समान धोरण कसे राबवता येईल, यासंदर्भात सरकारचा विचार करत असल्याची पुस्ती त्यांनी जोडली.

780 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे