Breaking News

 

 

मोदी सरकारची चिंता वाढली : आर्थिक विकासदर घसरला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार सलग दुसऱ्यांदा सत्तारूढ झाले. आज मंत्र्यांचे खातेवाटप झाले, केंद्रीय मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली. मात्र पहिल्याच दिवशी आर्थिक क्षेत्रात सरकारची चिंता वाढवणारे वृत्त आहे. २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत आर्थिक विकासदर ६ टक्क्यांपेक्षाही खाली गेला आहे.  

भारताच्या जीडीपी वाढीच्या दरात गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा घसरण झाली आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षात ७.२ टक्क्यांवर असणारा जीडीपी दर २०१८ -२०१९ या आर्थिक वर्षात ६.८ टक्क्यांवर आला आहे. शेती आणि निर्मिती क्षेत्रातील खराब प्रदर्शनाचा जीडीपीला फटका बसला आहे.
२०१८-१९ च्या जानेवारी-मार्चच्या पहिल्या तिमाहीत तर जीडीपी दर ६ टक्क्यांपर्यंत घसरला होता. जो की मागिल वर्षात याच तिमाहीत ८.१ टक्क्यांवर होता. या वर्षात वाढीचा दर ५.८ टक्क्यांपर्यंत आला असल्याचे केंद्राने दिलेल्या आकडेवारीत दिसून आल्याचे सांगण्यात आले आहे.

या वर्षात मार्चच्या तिमाहीतील वाढीचा दर हा २०१४-१५ पासून ते आतापर्यंतचा सर्वात कमी दर होता. या अगोदर २०१३ -१४ मधला ६.४ टक्के हा सर्वात नीचांकी दर होता. सरकारी आकडेवारीनुसार, आठ प्रमुख क्षेत्रांची वाढ गेल्या वर्षीच्या एप्रिलमध्ये ४.७ टक्क्यांवरून यावर्षी याच महिन्यात २.६ टक्क्यांवर आली आहे.

651 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash