Breaking News

 

 

सांख्यिकी मंत्रालयाने उघड केले बेरोजगारीचे भयाण वास्तव !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतातील बेरोजगारीचा सध्याचा दर मागील ४५ वर्षातील सर्वाधिक दर असल्याचे वास्तव समोर आले आहे. सांख्यिकी मंत्रालयाने दिलेल्या अहवालानुसार २०१७-१८ या वर्षात हा दर ६.१ टक्के इतका झाला आहे. मोदी सरकारने पाच वर्षांपूर्वीच रोजगार देण्याची घोषणा केली होती. मात्र त्यांनी जी घोषणा केली त्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकली नाही. कालच सत्तारूढ झालेले एनडीए – २ सरकार हे आव्हान कसे पेलते हे पाहणे महत्त्वाचे आहे.

विशेष म्हणजे हीच आकडेवारी जानेवारी महिन्यात बिझनेस स्टँडर्डनेही दिली होती. ही आकडेवारी सांख्यिकी मंत्रालयाचा अधिकृत अहवाल लीक झाल्याने समोर आल्याचं त्यांनी म्हटलं होतं. मात्र तो अहवाल अंतिम नाही अशी सारवासारव सरकारने केली. मात्र आता बेरोजगारीची आकडेवारी समोर आली आहे, ज्यामध्ये शहरी भागात ७.८ टक्के बेरोजगार आहेत तर ग्रामीण भागात ही टक्केवारी ५.३ टक्के इतकी आहे. स्त्री पुरुषांची आकडेवारी पाहिली तर भारतातील ६.२ टक्के पुरुष बेरोजगार आहेत. तर स्त्रियांमध्ये हे प्रमाण ५.७ टक्के आहे.

585 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग