Breaking News

 

 

मोदी-२ सरकारचा पहिला निर्णय पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेबाबत !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभा निवडणुकीत मोठे यश संपादन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ५८ मंत्र्यांनी यांनी काल (गुरुवार) शपथ घेतली. आज (शुक्रवार) दुसऱ्या दिवशी केंद्रातील मंत्र्यांचे खाते वाटप करण्यात आले. त्यानंतर आज संध्याकाळी मोदी यांनी नव्या केंद्रीय मंत्रिमंडळाची पहिली बैठक घेत कामाला सुरुवात केली. या बैठकीतील पहिला निर्णय घेतला तो पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेतील रकमेत वाढ करण्याचा… या रकमेत तब्बल २५ टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार आता दोन हजार रुपयांऐवजी अडीच हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे.

नव्या केंद्रीय मंत्रिमंडळाची पहिली बैठक पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थित पार पडली. दुसऱ्या मोदी सरकारचा पहिला निर्णय झाला. त्यानुसार पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेतील शिष्यवृत्तीत वाढ करण्यात आली आहे. याचा लाभ अनेक विद्यर्थ्यांना होणार आहे. पहिल्या बैठकीत १०० दिवसांच्या कार्यक्रमाची आखणी करण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच संसदेच्या अधिवेशनाची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे.

639 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा