Breaking News

 

 

आता ‘कागल’वर भगवा फडकवणे हेच लक्ष्य : संजयबाबा घाटगे

कागल (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील स्वाभिमानी जनतेने प्रा. मंडलिक यांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिले आहे. आता कागलवर १९९८ प्रमाणे पुन्हा भगवा फडकण्यास कार्यकर्ते उत्सुक आहेत. हेच लक्ष्य त्यांनी ठेवले आहे, असे सांगत प्रा. मंडलिक यांना देशपातळीवर काम करण्याची मोठी संधी मिळो, अशी सदिच्छाही माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी व्यक्त केली. नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याबद्दल आणि लोकसभा निवडणुकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात शिवसेनेला उज्ज्वल यश मिळाल्याबद्दल व्हनाळी (ता. कागल) येथे माजी आमदार संजयबाबा घाटगे यांच्यासह कार्यकर्त्यांनी साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला.

घाटगे म्हणाले की, प्रा. संजय मंडलिक यांच्या विजयाने शिवसेनाप्रमुख कै. बाळासाहेब ठाकरे व मातोश्री मीनाताई ठाकरे यांच्या इच्छेनुसार जिल्ह्यात शिवसेनेचा भगवा फडकला आहे. तर लोकनेते स्व. सदाशिवराव मंडलिक यांचीही स्वप्नपूर्ती झाली आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकल्याने कार्यकर्त्याचा आत्मविश्वास वाढला आहे. १९९८ नंतर कागल विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला अपयश आले आहे. मात्र, यावेळी कोणत्याही परिस्थितीत कागलमध्ये भगवा फडकविण्यासाठी जीवाचे रान करु असा निर्धार कागल निराधार समितीचे अध्यक्ष धनराज घाटगे यांनी व्यक्त केला.

या वेळी व्हनाळीसह गोरंबे, केनवडे, पिंपळगाव, शेंडूर परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

8,313 total views, 12 views today

One thought on “आता ‘कागल’वर भगवा फडकवणे हेच लक्ष्य : संजयबाबा घाटगे”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग