Breaking News

 

 

वाशी ग्रामस्थांतर्फे अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

वाशी (प्रतिनिधी) : वाशी (ता. करवीर) येथे श्री बिरदेव धनगर समाज, ग्रामपंचायत व वाशी ग्रामस्थांच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची २९४ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच सौ. गीता लोहार यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी संतोष रानगे यांनी अहिल्यामातेविषयी मनोगत व्यक्त केले. यावेळी ग्रा. पं. सदस्या सौ. संजीवनी पाटील, माजी उपसरपंच धनाजी लोहार, बाबासाहेब बुडके, आनंदा पुजारी, भागोजी पुजारी, दत्तात्रय पुजारी, यशवंत रानगे, वसंत पुजारी, विलास रानगे यांच्यासह धनगर समाजबांधव व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

687 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे