Breaking News

 

 

‘जय श्रीराम’च्या घोषणा ऐकून भडकल्या ममता अन् भलतंच बोलल्या !

कोलकाता (वृत्तसंस्था) : ‘जय श्रीराम’ च्या घोषणा देणाऱ्यांची चामडी सोलून काढू’, असे वादग्रस्त वक्तव्य पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलं आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, ममता बॅनर्जी या तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आयोजित एका आंदोलनात सहभागी होण्यासाठी २४ परगाणा जिल्ह्यात आल्या होत्या. त्यावेळी त्यांचा ताफा जात असताना काही जणांनी ‘जय श्रीराम’ च्या घोषणा दिल्या. या घोषणा ऐकून संतापलेल्या ममता यांनी त्यांची गाडी थांबविली व त्या गाडी बाहेर येऊन त्या लोकांना आव्हान दिलं.

‘तुमच्यात हिम्मत असेल तर माझ्यासमोर या. तुम्ही बंगालमधील नागरिक वाटत नाहीत, भाजपचे गुंड, बदमाश लोकं आहात तुम्ही. आमच्यामुळे तुम्ही इथे राहत आहात. तुमच्यासारख्या लोकांना मी इथून पळवून लाऊ शकते. तुमची हिम्मत कशी झाली असे करण्याची. एकेकाची चामडी सोलून काढेन’, असा इशारा त्यांनी दिला. तसेच ‘हे सर्व जण बाहेरचे लोकं आहेत. यातील स्थानिक एकही नाही. या सर्व उपद्रवी लोकांना तत्काळ अटक करा’, असे आदेश तिथे उपस्थित अधिकाऱ्यांना त्यांनी दिला.

याआधीही मिदनापूर जिल्ह्यातील चंद्रकोना येथे एका प्रचारसभेत जात असताना ममता बॅनर्जी यांच्या ताफ्यासमोर काही जणांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या होत्या. त्या वेळी देखील त्यांच्यावर संताप व्यक्त करणाऱ्या बॅनर्जी यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

1,380 total views, 3 views today

One thought on “‘जय श्रीराम’च्या घोषणा ऐकून भडकल्या ममता अन् भलतंच बोलल्या !”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

 

क्रीडा