Breaking News

 

 

जाणून घ्या, मोदी सरकारमधील कोणत्या मंत्र्याकडे कोणते खाते !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेसह ५८ केंद्रीय मंत्र्यांचा शपथविधी सोहळा गुरुवारी सायंकाळी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात पार पडला. अरुण जेटली, सुषमा स्वराज यांनी प्रकृतीअस्वास्थ्यामुळे मंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला आहे. मागील मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांना नव्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेले नाही. तर काहीजणांना पहिल्यांदाचे मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे. अमित शहांकडे गृह, निर्मला सीतारामन – अर्थ, राजनाथ सिंग – संरक्षण तर एस. जयशंकर यांना परराष्ट्र व्यवहार, पियुष गोयल यांच्याकडे रेल्वे खात्याचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.

जाणून घेऊ या मोदी सरकारचे मंत्रिमंडळ –

पंतप्रधान नरेंद्र मोदी – कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण खाते, निवृत्तीवेतन (पेन्शन), अणुउर्जा विभाग, अंतराळ विभाग या खात्यांची जबाबदारी असेल. तसेच खातेवाटपानंतर जी खाती रिक्त राहतील त्याचा कार्यभारही मोदी यांच्याकडे असेल. 

मंत्री खातं राज्य
नितीन गडकरी रस्ते आणि वाहतूक महाराष्ट्र
अमित शहा गृह गुजरात
पीयूष गोयल रेल्वे महाराष्ट्र
राजनाथ सिंह संरक्षण उत्तर प्रदेश
प्रकाश जावडेकर माहिती आणि प्रसारण, पर्यावरण महाराष्ट्र
स्मृती इराणी महिला आणि बालकल्याण उत्तर प्रदेश
डॉ. हर्षवर्धन आरोग्य दिल्ली
निर्मला सीतारामन अर्थ तामिळनाडू
सदानंद गौडा रसायन आणि खते कर्नाटक
नरेंद्रसिंग तोमर कृषी आणि ग्रामविकास मध्य प्रदेश
रमेश पोखरियाल निशंक मनुष्यबळ विकास उत्तराखंड
अर्जुन मुंडा आदिवासी विकास झारखंड
धर्मेंद्र प्रधान पेट्रोलियम ओडिशा
मुख्तार अब्बास नकवी अल्पसंख्याक कल्याण उत्तर प्रदेश
फग्गनसिंह कुलस्ते राज्यमंत्री मध्य प्रदेश
महेंद्रनाथ पांडेय कौशल्य विकास उत्तर प्रदेश
गजेंद्र सिंग शेखावत जलसंपदा राजस्थान
संतोष गंगवार कामगार राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) उत्तर प्रदेश
राव इंद्रजीत सिंह सांख्यिकी राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) हरियाणा
नित्यानंद राय गृह राज्यमंत्री बिहार
श्रीपाद नाईक आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) गोवा
जितेंद्र सिंह ईशान्य भारत विकास राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) जम्मू काश्मीर
प्रल्हाद पटेल सांस्कृतिक राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) मध्य प्रदेश
अर्जुनराम मेघवाल संसदीय कामकाज राज्यमंत्री राजस्थान
जनरल व्ही. के. सिंह वाहतूक राज्यमंत्री उत्तर प्रदेश
कृष्णपाल गुर्जर सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री हरियाणा
रावसाहेब दानवे सार्वजनिक वितरण राज्यमंत्री महाराष्ट्र
जी.कृष्णा रेड्डी गृह राज्यमंत्री तेलंगणा
पुरुषोत्तम रुपाला कृषी राज्यमंत्री गुजरात
आर. के .सिंह उर्जा राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) बिहार
मनसुख मांडविया नौकानयन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) गुजरात
थावरचंद सिंग गेहलोत सामाजिक न्याय मध्य प्रदेश
बाबुल सुप्रियो पर्यावरण राज्यमंत्री बंगाल
संजीव बालियान प्राणी आणि पशुकल्याण राज्यमंत्री उत्तर प्रदेश
संजय धोत्रे मनुष्यबळ विकास राज्यमंत्री महाराष्ट्र
अनुराग ठाकूर अर्थ राज्यमंत्री हिमाचल प्रदेश
सुरेश अंगडी रेल्वे राज्यमंत्री कर्नाटक
रत्तनलाल कटारिया जलसंपदा राज्यमंत्री हरियाणा
व्ही. मुरलीधरन परराष्ट्र राज्यमंत्री केरळ
रेणुका सिंग सरुता आदिवासी राज्यमंत्री छत्तीसगढ
सोम प्रकाश वाणिज्य आणि व्यापार राज्यमंत्री पंजाब
रामेश्वर तेली अन्नप्रक्रिया राज्यमंत्री आसाम
कैलाश चौधरी कृषी राज्यमंत्री राजस्थान
देबोश्री चौधरी महिला आणि बालकल्याण राज्यमंत्री पश्चिम बंगाल
रविशंकर प्रसाद कायदे आणि माहिती तंत्रज्ञान बिहार
रामविलास पासवान ग्राहक संरक्षण आणि अन्न वितरण बिहार
हरसिमरत कौर बादल अन्नप्रक्रिया उद्योग पंजाब
अरविंद सावंत अवजड उद्योग महाराष्ट्र
रामदास आठवले सामाजिक न्याय राज्यमंत्री महाराष्ट्र
साध्वी निरंजन ज्योती ग्रामविकास राज्यमंत्री मध्य प्रदेश
किरन रिजिजू युवक आणि क्रीडा कल्याण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) अरुणाचल प्रदेश
गिरीराज सिंह पशुकल्याण बिहार
एस. जयशंकर परराष्ट्र मंत्री माजी परराष्ट्र सचिव
हरदीप सिंग पुरी गृहनिर्माण आणि नगरविकास राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) उत्तर प्रदेश
प्रल्हाद जोशी संसदीय कामकाज मंत्री कर्नाटक
प्रताप सारंगी सुक्ष आणि लघु उद्योग राज्यमंत्री ओडिशा
अश्वनी चौबे आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्री बिहार

2,142 total views, 9 views today

One thought on “जाणून घ्या, मोदी सरकारमधील कोणत्या मंत्र्याकडे कोणते खाते !”

  1. Narendra bhai Modi ji prime minister Bharat Sarkar aapko badhai ho aap ke naye mantrimandal sthapana Ho Gaye aapke kaam kaaj ke liye bahut bahut dhanyavad aapko shubhechha

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे