Breaking News

 

 

‘या’मुळेच जेडीयू मोदी सरकारमध्ये सामील नाही !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारमध्ये जेडीयू सहभागी होणार नाही, मात्र, आपला पक्ष एनडीएचा एक भाग राहील, असे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी स्पष्ट केले. त्यामुळे मोदी सरकारला पहिला झटका बसला आहे. आज (गुरुवार) सायंकाळी मोदी सरकारचा शपथविधी पार पडला. २५ कॅबिनेट आणि ३३ राज्यमंत्र्यांनी यावेळी शपथ घेतली.

लोकसभा निवडणुकीत जेडीयूने १६ जागा जिंकल्या आहेत. जेडीयूला केवळ एकच मंत्रीपद देण्याचे भाजपने निश्चित केल्याने नितीश कुमार कमालीचे नाराज झालेत. त्यांनी मोदी सरकारमध्ये सहभागी होणार नाही, असे स्पष्ट करत आपली नाराजी व्यक्त केली. आम्ही सरकारमध्ये सहभागी होणार नाही, याची माहिती भाजप अध्यक्ष अमित शाह यांना दिली आहे, आम्ही एनडीएसोबत आहे, पण सरकारमध्ये नाही. त्यामुळे आमच्यावर कोणतेही बंधन नाही.आम्हाला एका मंत्रीपदाची गरज नाही. ही एक मोठी समस्या नाही, आम्ही पूर्णपणे एनडीएमध्ये आहोत आणि आम्ही नाराज नाही. आम्ही एकत्र काम करत आहोत, असेही ते म्हणालेत.

1,323 total views, 6 views today

One thought on “‘या’मुळेच जेडीयू मोदी सरकारमध्ये सामील नाही !”

  1. नितीशकुमार यांची भूमिका रास्तच.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा