Breaking News

 

 

पंचगंगा स्मशानभूमीतील गॅस दाहिनी १५ दिवसात सुरू करा : महापौर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापालिकेच्या पंचगंगा स्मशानभूमी येथील गॅस दाहिनी १५  दिवसात कार्यान्वीत करायची आहेत त्या दृष्टीने येथील सिव्हील वर्क १० दिवसात पुर्ण करण्याचे आदेश महापौर सौ. सरिता मोरे यांनी दिले. आज (गुरुवार) पंचगंगा स्मशानभूमी व गॅस दाहिनीची पाहणी महापौरांनी अधिकाऱ्यांसमवेत केली.

बडोदा येथील उद्योगपती व मूळचे कोल्हापूरचे असलेले रहिवाशी तसेच अल्फा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे मालक राजेंद्र चव्हाण यांनी कोल्हापूर महानगरपालिकेस मोफत गॅस दाहिनी दिली आहे. सदरच्या गॅस दाहिनीचे काम सुरु करण्यात आले होते. त्याचे फौंडेशनसह चिमणीचे काम पुर्ण झाले असून आतमध्ये गॅस दाहिणी बसविण्यात आलेली आहे. महापौर मोरे यांनी या ठिकाणी रक्षा ठेवणेसाठी लॉकर्स, गॅस सिलेंडरसाठी स्वतंत्र कक्ष, विसावा बेड, एलईडी लाईट व इतर आवश्यक ती सर्व कामे तातडीने करुन घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. 

या वेळी उपमहापौर भूपाल शेटे, नगरसेवक ईश्वर परमार, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक भोसले, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, अल्फा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे मालक राजेंद्र चव्हाण,  विद्युत अधीक्षक रोहन डावखरआदी उपस्थित होते.

231 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा