Breaking News

 

 

‘पक्ष खडतर अवस्थेत, जबाबदारीपासून पळ काढू नका…’

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवी दिल्लीत पंतप्रधान मोदींसह केंद्रीय मंत्र्यांचा शपथविधी सोहळ्याची तयारी सुरु असताना आज (गुरुवार) दुपारी चारच्या सुमारास राहुल गांधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी गेले होते.  यावेळी राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याच्या हालचाली सुरू असल्याचीही चर्चेला उधाण आले. मात्र शरद पवारांनी या चर्चेला पूर्णविराम दिलाय. विलिनीकरणाबाबत कुठलीही चर्चा झाली नसल्याचं त्यांनी बैठकीनंतर स्पष्ट केलं.

पवार म्हणाले, महाराष्ट्रातील निवडणुकी संदर्भात विश्लेषणात्मक चर्चा राहुल गांधी यांच्या सोबत झाली. राज्यातील  दुष्काळासंदर्भातही आम्ही बोललो. मात्र इतर विषयांवर चर्चा झाली नाही. काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी दुसरा पर्याय सध्याच दिसत नाही. पक्ष खडतर स्थितीतून जात असताना जबाबदारीपासून पळ काढू नये. त्यामुळे तुम्ही राजीनामा देणे योग्य नाही, असं आपण राहुल यांना सांगितले आहे.

पवार यांच्या या स्पष्टीकरणामुळे राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचे वृत्त निराधार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

1,626 total views, 9 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा