Breaking News

 

 

‘मैंं नरेंद्र दामोदरदास मोदी, ईश्वर की शपथ लेता हूँँ की…’

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ‘मैं नरेंद्र दामोदरदास मोदी, ईश्वर की शपथ लेता हूं की…’असे म्हणत मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्या रूपाने काँग्रेसेतर पक्षाचा नेता सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान झाला आहे. मोदी हे देशाचे १५ वे पंतप्रधान ठरले आहेत. आज (गुरुवार) सायंकाळी राष्ट्रपती भवनातील प्रांगणात दिग्गज नेते, विशेष निमंत्रितांच्या उपस्थितीत भाजपप्रणीत एनडीएच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींंसह इतर सर्व मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

या शपथविधी सोहळ्यासाठी देश-परदेशातून तब्बल ८ हजार पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. तसेच देशातील सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, विरोधी पक्षांचे प्रमुख नेते, उद्योगपती, कला, क्रीडा विश्वातील मान्यवरांना या सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. नरेंद्र मोदी यांच्यानंतर राजनाथ सिंग, अमित शहा, नितीन गडकरी, डी. व्ही. सदानंद गौडा, निर्मला सीतारमण, रामविलास पासवान, पीयुष गोयल, रविशंकर प्रसाद, स्मृती इराणी, हरसिम्रत कौर बादल, किरण रिजीजू, प्रकाश जावडेकर, श्रीपाद नाईक, धर्मेंद्र प्रधान, संतोषकुमार गंगवार, जितेंद्र सिंह, थावरचंद गेहलोत, एस. जयशंकर, रमेश निशांक, अर्जुन मुंडा,  डॉ. हर्षवर्धन, प्रकाश जावडेकर, अरविंद सावंत आदी मंत्र्यांनी शपथ घेतली.

1,710 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा