Breaking News

 

 

कोल्हापुरी रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा…

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापुरचा रिक्षावाला प्रामाणिकपणामुळे नेहमीच कौतुकास पात्र राहीला आहे. अधूनमधून रिक्षावाल्यांच्या प्रामाणिकपणाच्या घटनाही घडत असतात. अशीच घटना आज (गुरुवार) घडली. रिक्षात विसरलेले रोख १५ हजार आणि महत्वाची कागदपत्रे संबंधीतांना परत देऊन जमीर रशीद मुल्ला या रिक्षाचालकाने आपला प्रामाणिकपणा दाखवून दिला.

मायबाप सारख्या चित्रपटामध्येही आपल्या प्रामाणिकपणामुळे रिक्षाचालकांनी स्थान मिळवले. कोल्हापूरच्या रिक्षाचालकांच्या प्रामाणिकपणाची ख्याती सर्वदूर पसरली आहे. आज सकाळी राजारामपुरी दुसरी गल्ली येथे राहणाऱ्या प्राची मांगलेकर या सकाळी साडे नऊच्या सुमारास रिक्षातून नंदादिप हॉस्पिटलपासून मध्यवर्ती बसस्थानकाकडे गेल्या. तिथे त्या रिक्षातून उतरल्या पण त्यांच्याकडे असलेले रोख पंधरा हजार रुपये व महत्वाच्या कागदपत्रांची बॅग रिक्षामध्ये विसरल्या.

रिक्षाचालक जमीर मुल्ला (रा. लिशा हॉटेल) शेजारी यांनी कागदपत्र्यावरील पत्त्यावरुन मांगलेकर यांच्याशी संपर्क साधून त्यांना शाहुपुरी पोलीस ठाण्यात बोलावून विसरलेली बॅग परत दिली. त्यांच्या या प्रामाणिकपणाबद्ल शाहुपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक संजय मोरे यांनी मुल्ला यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

636 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे