पुणे (प्रातिनिधी) : ‘मी स्वत:ला राज्यपाल मानत नाही, असे वक्तव्य भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे. पुण्यातील डेक्कन चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चरच्या वतीने वार्षिक पुरस्कार सोहळ्यात कोश्यारी यांनी हे वक्तव्य केले आहे.  कोश्यारींच्या या वक्तव्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. 

पुरस्कार सोहळ्यात राज्यपाल यांचे भाषण सुरू होते. यावेळी त्यांच्या समोरील बाजूला व्हिडीओ रेकॉर्डिंग करणाऱ्याच्या मागे एक महिला बसली होती. त्या महिलेला व्यासपीठावरील राज्यपाल दिसत नव्हते. त्यामुळे तिने राज्यपालांना दुसर्‍या बाजूच्या डायसवर येऊन बोलण्याची विनंती केली. त्यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले की तुम्हाला भाषण ऐकायचे आहे की बघायचे आहे, तसेच ते म्हणाले की ‘मैं मानताही नहीं की, मैं राज्यपाल हूँ’ तुम्ही जसे बोलणार, तसे मी करणार.