Breaking News

 

 

…आता ‘मास्टर ब्लास्टर’ नव्या भूमिकेत

मुंबई (प्रतिनिधी) : ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकर पुन्हा एकदा क्रीडा रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी सज्ज आहे. फक्त यावेळी त्याचा अंदाज काहीसा वेगळा आणि तितकाच प्रभावी असेल. क्रिकेट सामन्यांपूर्वी होणाऱ्या चर्चांमध्ये सहभागी होणारा सचिन आता चक्क समालोचन कक्षात दिसणार असल्याची माहिती ‘स्टार स्पोर्स्ट्स’च्या ट्विटर अकाऊंटवरुन देण्यात आली आहे.

इंग्लंड आणि  दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये खेळवल्या जाणाऱ्या विश्वचषकाच्या पहिल्या सामन्याच्या वेळी त्याचा हा अंदाज पाहता येणार आहे. लंडनमधील ओव्हल स्टेडियम येथे हा सामना खेळला जाणार आहे. 

‘फिलिप ह्यू क्रिकेट लाईव्ह प्री- शो’मध्ये तो सहभागी होणार आहे. ज्यामध्ये तो ‘सचिन ओपन अगेन’ या त्याच्या स्वत:च्या खास कार्यक्रमाची धुरा सांभाळताना दिसेल. सचिनसोबतच मैदान गाजवणारे काही खेळाडू त्याच्यासोबत दिसणार आहेत. त्यामुळे क्रीडा रसिकांसाठी ही परवणीच ठरणार आहे.

567 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा