Breaking News

 

 

काँग्रेसमध्ये विलीन होणार राष्ट्रवादी काँग्रेस ?

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या राजकारणात सर्वात मोठी घडामोड समोर येत आहे. शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याची शक्यता असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची दिल्लीत बैठक होत आहे. या बैठकीतून ही माहिती समोर आली आहे.

याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी विलीन करण्याबाबत प्राथमिक चर्चा सुरु आहे. पवार-राहुल यांच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. लोकसभेत विरोधी पक्षनेते कसे मिळवता येईल याचीही चाचपणी सध्या सुरु आहे. मूळ काँग्रेसमधून फुटून निर्माण झालेल्या सर्व पक्षांना पुन्हा काँग्रेसमध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. पक्ष मजबूत करणं हा त्यामागचा तर्क आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन केल्यास लोकसभेचे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

2,622 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

 

क्रीडा