Breaking News

 

 

शपथविधीसाठी शहीद जवानांच्या कुटुंबीयांनाही निमंत्रण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नरेंद्र मोदी आज (गुरुवार) संध्याकाळी सात वाजता राष्ट्रपती भवनात दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचे कुटुंबीय उपस्थित राहणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शपथविधीसाठी त्यांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. शपथविधीसाठी निमंत्रण देण्यात आलेल्यांमध्ये ममता बिस्वास यांचेही नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांमध्ये सुदीप यांची आई ममता सहभागी होणार आहेत. पंजाब आणि हिमाचल प्रदेशातील शहिदांच्या कुटुंबीयांना शपथविधीसाठी निमंत्रण करण्यात आले नाही.

१४ फेब्रुवारी २०१९ रोजी जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. यानंतर भारताने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये घुसून एअर स्ट्राइक करत जवानांच्या मृत्यूचा बदला घेतला होता. भारतीय हवाई दलाने बालाकोटमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करत अनेक दहशतवादी ठार केले होते.

567 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash