Breaking News

 

 

लोकसभेच्या हंगामी अध्यक्षपदी संतोष गंगवार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नरेंद्र मोदी आज (गुरुवार) दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी आठ वेळा खासदार राहिलेले संतोष गंगवार हे लोकसभेचे हंगामी अध्यक्ष असणार आहेत. लोकसभेतील सर्व सदस्यांना शपथ देणे आणि त्यांचे स्वागत करणे आदिंची जबाबदारी हंगामी अध्यक्षांची असते. त्यामुळे आज या अध्यक्षपदी संतोष गंगवार उपस्थित असणार आहेत.

तब्बल आठ वेळा लोकसभेचे सदस्य राहिलेले गंगवार हे ज्येष्ठ सदस्य असल्याने त्यांच्याकडे हंगामी सभापतीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. संतोष गंगवार हे उत्तर प्रदेशमधील बरेली येथून निवडून आले खासदार आहेत. हंगामी अध्यक्षपदासाठी मनेका गांधी आणि संतोष गंगवार या दोघांची नावे आघाडीवर होती. गंगवार हंगामी अध्यक्ष असतील हे स्पष्ट झाल्याने मनेका गांधी यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार का, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

यापूर्वी सोळाव्या लोकसभेत माजी संसदीय कामकाजमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांची लोकसभेच्या हंगामी सभापतीपदी नियुक्ती करण्यात आली होती. लोकसभेतील ज्येष्ठ सदस्याची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्याची परंपरा असली तरी सहाव्या लोकसभेत के. एस. हेगडे आणि सातव्या लोकसभेत बलराम जाखड यांनी हंगामी अध्यक्ष म्हणून कामकाज पाहिले होते. हे दोन्ही खासदार पहिल्यांदाच लोकसभेवर निवडून आले होते.

417 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *