Breaking News

 

 

केंद्रीय मंत्री म्हणून अरविंद सावंत घेणार शपथ…

मुंबई (प्रतिनिधी) : काँग्रेसचे पानिपत करून ‘शत-प्रतिशत’ भाजपाला विजय मिळवून देणारे नरेंद्र मोदी आज (गुरुवार) पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी शिवसेना – भाजपच्या काही खासदांराना केंद्रीय मंत्री म्हणूनही शपथ देण्यात येणार आहे. यामध्ये शिवसेना खासदार अरविंद सावंत यांचाही समावेश आहे.  शिवसेना नेते संजय राऊत यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

शपथविधीसाठी अरविंद सावंत कुटुंबासह दिल्लीला रवाना झाले आहेत. शपथविधी सोहळ्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कुटुंबासहित उपस्थित राहणार आहेत.गेल्या मंत्रिमंडळात शिवसेनेचा फक्त एक मंत्री होता. यावेळी किमान दोन मंत्रिपदे शिवसेनेला दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. शिवसेनेच्यावतीने अनिल देसाई, भावना गवळी, विनायक राऊत, राहुल शेवाळे, अरविंद सावंत यांची नावे चर्चेत होती.

दक्षिण मुंबईमधून काँग्रेसच्या मिलिंद देवरा यांना पराभूत करून सावंत हे दुसऱ्यांदा खासदार झाले आहेत. सावंत यांना सर्वोत्कृष्ट संसदपटू म्हणून व संसदेत सर्वात जास्त उपस्थिती असलेले खासदार म्हणून गौरवण्यात आले आहे. राज्यात होणारी आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन महाराष्ट्राचा मंत्रिमंडळातील वाटा वाढू शकतो. नितीन गडकरी, पीयूष गोयल, सुरेश प्रभू, प्रकाश जावडेकर या ज्येष्ठ नेत्यांची मंत्रिपदे कायम राहतील. रामदास आठवले यांचेही मंत्रिपद निश्चित मानले जाते. सुभाष भामरे यांना पुन्हा मंत्रिपद मिळेल का, याची उत्सुकता आहे.

486 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे