Breaking News

 

 

अशिक्षित वाहनचालकांचे परवाने रद्द करा : हायकोर्टाचे निर्देश

जोधपूर (वृत्तसंस्था) : अशिक्षित वाहनचालक हे रस्त्यावरील पादचाऱ्यांसाठी धोकादायक आहेत. अशा वाहनचालकांचे परवाने रद्द करावे, असे निर्देश राजस्थान हायकोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत. लिहिता- वाचता येत नाही अशा लोकांना ज्यांनी परवाने मंजूर केले त्यांच्यावरही कारवाई करावी, असेही हायकोर्टाने म्हटले आहे.

राजस्थानमध्ये राहणाऱ्या दीपक सिंह नामक व्यक्तीने हायकोर्टात याचिका दाखल केली होती. दीपक सिंह यांचे पाचवीपर्यंतचे शिक्षण झाले आहे. २००६ मध्ये त्यांनी लाईट मोटर व्हेईकल या श्रेणीत वाहन परवाना मिळवला होता. आता त्यांना ट्रान्सपोर्ट व्हेईकलसाठी परवाना हवा आहे. पण आठवी उत्तीर्ण नसल्याने त्यांना परवाना देता येणार नाही, असे परिवहन विभागाने त्यांना सांगितले होते. याविरोधात दीपक सिंह यांनी याचिका दाखल केली होती. गेल्या १३ वर्षांपासून याचिकाकर्ते वाहन चालवत असल्याने त्यांना परवाना द्यावा, असा युक्तिवाद वकिलांनी केला होता.

न्यायाधीश संजीव शर्मा यांच्या पीठासमोर याचिकेची सुनावणी झाली. हायकोर्टाने दीपक सिंह यांची याचिका फेटाळून लावली असून दीपक सिंह आणि अन्य अशिक्षित वाहनचालकांना देण्यात आलेले परवाने रद्द करावेत, असे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. मोटार वाहन अधिनियम हे वाहन चालकांसोबतच रस्त्याचा वापर करणाऱ्या अन्य नागरिकांचा विचार करुन तयार केले पाहिजे, असे मतही हायकोर्टाने व्यक्त केले आहे.

1,236 total views, 9 views today

One thought on “अशिक्षित वाहनचालकांचे परवाने रद्द करा : हायकोर्टाचे निर्देश”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash