Breaking News

 

 

महाराष्ट्रात युतीचे सरकार आणण्याचा निश्चय : आ. राजेश क्षीरसागर

मुंबई (प्रतिनिधी) : येत्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना–भाजप महायुतीचे दहा आमदार निवडून आणू आणि पुन्हा महाराष्ट्रात युतीचे सरकार आणण्याचा निश्चय सर्वांनी केला असल्याचे आ. क्षीरसागर यांनी सांगितले. महाराष्ट्रात शिवसेना–भाजपा युतीला मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल आ. राजेश क्षीरसागर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीमध्ये भेट घेवून विजयाच्या शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री नाम. देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेवून त्यांचे अभिनंदन केले.

आ. राजेश क्षीरसागर म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत राज्यात शिवसेना-भाजपने एकत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता. शिवसेना व भाजपसह मित्र पक्ष यांनी एकत्र प्रचार करत राज्यातील ४८ पैकी ४१ जागांवर विजय मिळवला. हा विजय ऐतिहासिक विजय असून केंद्रात पुन्हा मोदी पंतप्रधान होणार आहेत. तर आगामी निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आपल्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात पुन्हा युतीची सत्ता येईल, यात काडीमात्र शंका नसल्याचे सांगितले.

कोल्हापूरच्या लोकसभेच्या दोन्ही जागांवरील विजय हा विधानसभेच्या विजयाची नांदी आहे. युतीच्या विजयात शिवसेना, भाजप महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केलेले कष्ट हे या विजयाचे फळ आहे. शिवसेनेचा खासदार व्हावा, ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्णत्वास आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही खासदार युतीचे झाल्याने संपूर्ण जिल्हा शिवसेना भाजप युतीमय झाला आहे.

येत्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना–भाजप महायुतीचे दहा आमदार निवडून आणू आणि पुन्हा महाराष्ट्रात युतीचे सरकार आणण्याचा निश्चय सर्वांनी केला असल्याचे सांगितले. त्यामुळे आगामी काळात कोल्हापूर शहरातील प्रलंबित प्रश्न आणि विकास कामे मार्गी लावण्यासाठी जातीने लक्ष घालवे, अशी मागणीही आ. राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

627 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग