Breaking News

 

 

आता अनिरुध्द अष्टपुत्रे कोल्हापूरचे नवे माहिती उपसंचालक !

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शासनाची ध्येय-धोरणे, विविध उपक्रम, लोककल्याणकारी निर्णय यांना व्यापक प्रसिध्दीच्या दृष्टीने माहिती विभाग अधिक गतिमान करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन कोल्हापूर विभागाचे नूतन माहिती उपसंचालक अनिरुद्ध अष्टपुत्रे यांनी केले. त्यांनी आज (बुधवार) पदाचा कार्यभार स्वीकारला. विभागीय माहिती कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.

अष्टपुत्रे हे यापूर्वी जिल्हा माहिती अधिकारी रायगड-अलिबाग येथे कार्यरत होते. तेथून पदोन्नतीने त्यांची कोल्हापूर माहिती उपसंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अष्टपुत्रे यांनी २० वर्षापासून मंत्रालयात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात सहायक संचालक आणि कालांतराने वरिष्ठ सहायक संचालक म्हणून काम पाहिले. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांचे जनसंपर्क अधिकारी म्हणूनही मुख्यमंत्री सचिवालयात त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. महासंचालनालयाकडील सुमारे ५ हजार दुर्मिळ आणि खुप जुन्या चित्रपट, वृत्तचित्र आणि माहितीपटांच्या डिजिटलाझेशनाचे काम त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केले आहे.

222 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा