Breaking News

 

 

भडगांव येथील सतीश सभासद यांना ‘ऊस सम्राट’ पुरस्कार…

गडहिंग्लज प्रतिनिधि : भडगाव (ता. गडहिंग्लज) येथील प्रगतशील शेतकरी सतीश सभासद यांना ‘ऊस सम्राट’ या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. ‘होय आम्ही शेतकरी’ समूहाच्यावतीने २०१९ चा हा पुरस्कार देण्यात आला.

अगदी प्रतिकूल परिस्थितीशी लढा देत ऊस शेतीत विक्रमी उत्पादन सतीश सभासद यांनी घेतले. यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांनी आधुनिक बदलाचा स्विकार करुन शेतीत बदल करत चांगले उत्पादन घेण्याचा प्रयत्न करावा, असे मत सतीश सभासद यांनी ‘लाईव्ह मराठी’शी बोलताना व्यक्त केले.

846 total views, 3 views today

One thought on “भडगांव येथील सतीश सभासद यांना ‘ऊस सम्राट’ पुरस्कार…”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

देश-विदेश