Breaking News

 

 

‘यामुळे’च बँकांच्या प्रतिनिधींना मुख्यमंत्र्यांनी झापले ! : कारवाईचाही इशारा

मुंबई (प्रतिनिधी) : अगोदरच विरोधकांकडून आणि शेतकरी संघटनांकडून राज्य सरकारवर शेतकऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष केले जात असल्याच्या आरोपांमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वैतागले आहेत. त्यातच पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट गाठण्यात बँकांनी हयगय केल्याने फडणवीस यांनी बँकांच्या प्रतिनिधींना अक्षरश: धारेवर धरले. या बँकांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात आज (गुरुवार) राज्यस्तरीय बॅंकर्स समितीची बैठक पार पडली. या बैठकीत ४ लाख २४ हजार २९ कोटी रुपयांच्या वार्षिक पतपुरवठा आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे. बँकांना २०१९-२० या वर्षासाठी ५९,७६६ कोटींची उद्दिष्ट देण्यात आले. खरीपासाठी ४३,८४४ कोटी आणि रब्बी हंगामासाठी १५,९२१ कोटी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

त्यानंतर गतवर्षीच्या पीक कर्ज वाटपामध्ये फक्त ५४ टक्के उद्दिष्ट साध्य झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी बँकांच्या प्रतिनिधींना धारेवर धरलं. शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट न गाठल्याने बँकांना कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. आज सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या राज्यस्तरीय बॅंकर्स समितीच्या बैठकीत सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या बैठकीत कृषिमंत्री चंद्रकांत पाटील, वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर, महाराष्ट्र बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक श्री. राजीव यांच्या विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, बॅकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

606 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *