Breaking News

 

 

मंडलिक खासदार होईपर्यंत चप्पल न घालण्याचा संकल्प केलेल्या कार्यकर्त्याचा सत्कार !

गारगोटी (प्रतिनिधी) : प्रा. संजय मंडलिक हे खासदार होईपर्यंत पायामध्ये चप्पल न घालण्याचा संकल्प नाधवडे (ता. भुदरगड) येथील युवा कार्यकर्ते जयवंत वायदंडे यांनी केला होता. प्रा. संजय मंडलिक हे २ लाख ६९ हून अधिक मतांनी विजयी झाले. नेत्यावर अविचल निष्ठा ठेवून संकल्प केल्याबद्दल आ. प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते जयवंत वायदंडे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी शिवसेना राधानगरी विधानसभा संपर्कप्रमुख दिनानाथ चौगले उपस्थित होते.

या वेळी आ. आबिटकर म्हणाले की, जयवंत वायदंडे यांच्यासारख्या असंख्य इर्षेबाज कार्यकर्त्यांच्या जोरावर ही निवडणूक प्रा. संजय मंडलिक सहज जिंकू शकले. विदर्भासारख्या असणाऱ्या या तापमानामध्ये जयवंत वायदंडे यांनी २ महिने पायामध्ये चप्पल न घालता प्रचार केला. त्यांचे अभिनंदन करावे तितके थोडे आहे. शिवसेना-भाजपा व मित्र पक्षांचे सर्व प्रमुख नेते, कार्यकर्ते व सर्वसामान्य मतदारांच्या विश्वासामुळे मंडलिक यांना राधानगरी, भुदरगड व आजरा विधानसभा मतदारसंघातून ३९, ९५२ इतके विक्रमी मताधिक्य मिळाले.

जयवंत वायदंडे म्हणाले की, माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांचे मिणचे खोऱ्यावर असंख्य उपकार आहेत. त्यांची शेवटची इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर होती. ती आम्ही यशस्वीपणे पूर्ण केली आहे.

या वेळी नाधवडेचे सरपंच रायाण्णा वायदंडे, हिंदूराव झांबरे-पाटील, श्रीकांत कांबळे, अनिल पाटील, बाबूराव पाटील, माजी सरपंच अनिल पाटील, शरद वैराट, दिगंबर पाटील, किसन पाटील, कृष्णात वैराट, विशाल वायदंडे, सुरज देवकूळे, तानाजी पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

1,566 total views, 6 views today

One thought on “मंडलिक खासदार होईपर्यंत चप्पल न घालण्याचा संकल्प केलेल्या कार्यकर्त्याचा सत्कार !”

  1. अशा कार्यकर्त्यांचा सत्कार केल्याबद्दल नूतन खासदारांचे आभार कारण हीच आपली खरी शक्ती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग